ज्ञानदेव गुरु ज्ञानद
25.
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू । उतरील पैल पारू ज्ञानदेव ॥१॥
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निर्धारे ज्ञानदेव ॥३॥
सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेवे ॥४॥
