भांबावोनी प्राणी संस
27.
भांबावोनी प्राणी संसारी गुंतले । माझे म्हणोनि श्रमले भव नदी ॥१॥
नामाची सांगडी न बांधिती कोणी । चौऱ्यांशीची खाणी भोगिताती ॥२॥
आपुला आपण झाला असे वैरी । हिडे दारोदारी भीक मागा ॥३॥
बंका म्हणे नाम सांडोनी विठ्ठल । वाचे बोलती बोल वाउगाची ॥४॥
