वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

भय म्या अदृष्ट करावे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075845 · अभंग क्र. २४

24.
भय म्या अदृष्ट करावे आपण ।
आले जे ठाकून सोसी येथे ॥१॥
वाही येत वारे आंगासी माझीया ।
घुमारीन काया नव्हे माझी ॥२॥
वधर्म आपुला रक्षूनिया मने ।
शास्त्राच्या श्रवणे देव साधू ॥३॥
भ्रताराची सेवा तोचि आम्हा देव ।
भ्रतार स्वयमेव परब्रह्म ॥४॥
तीर्थ भ्रतराचे सर्वतीर्थ जाण ।
तया तीर्थावीण निरर्थक ॥५॥
भ्रतारवचनासी उल्लंघीन जरी ।
पापे माझ्या शिरी पृथिवीची ॥६॥
धर्म अर्थ काम मोक्षासी अधिकारी ।
भ्रतार साचार वेद बोले ॥७॥
हा माझा निश्चय मनातील हेत ।
भ्रतारेसी चित्त लाविलेसे ॥८॥
भ्रतारसेवेने सांग हा परमार्थ ।
भ्रतारेच स्वार्थ सर्व आहे ॥९॥
भ्रतारा वाचून अन्य देव जरी ।
येईल अंतरी ब्रह्महत्या ॥१०॥
सद्गुरू भ्रतार साधन भ्रतार ।
हा सत्य निर्धार अंतरीचा ॥११॥
बहेणि म्हणे देवा भ्रताराचे मनी ।
तुवा प्रवेशोनी स्थिर केले ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग