वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 229. धृवचरित्र

घरा येता बाळ देखिले

🙏 4. संत नामदेव · ABH-083933 · अभंग क्र. २१८९

2189.
घरा येता बाळ देखिले मातेने । दाटली दु:खाने बोलवेना ॥१॥
आक्रंदोनि पुढे मोकळोनि धाये । नेणो कैसे काय झाले यासी ॥२॥
घालोनिया कव घेता कडेवरी । दोन्ही नेत्र करी पुसीतसे ॥३॥
काय झाले बाळा सांग बा वृत्तांत । बा कोण तूंते पाहो नेणे ॥४॥
नामा म्हणे असो प्रेमा तो अपार । पुढील विचार बोलीजेला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग