कोणे एके दिवशी खेळत
2183.
कोणे एके दिवशी खेळत खेळत । गेला सभेआंत राजयाच्या ॥१॥
पाहिले राजाने ओळखिला पुत्न । झळंबले गात्र आवडीने ॥२॥
गोजिरा गोमटा शाहाणा चपळ । नेत्न ते विशाळ पुंजाळले ॥३॥
नामा म्हणे चंद्र पूर्णमेचा पाहातो । समुद्रा ये भरते तैसे झाले ॥४॥
