ध्रुवचरित्र.
2179.
ध्रुवचरित्र.
राजयासी सर्व वृत्तांत ठाउका । असोनी बाळका पाही नातो ॥१॥
कामीक जगासी कामचि आवडे । स्त्रीमोहाने वेडे झाले बहु ॥२॥
रावणाने वेदा ऋचा पदे केली । सीतेलागी आली भ्रांती कैसी ॥३॥
पाराशरा ऐसा दासीसी शमन । हे नव्हे बोलणे आश्चर्याचे ॥४॥
विश्वामित्र झाला रंभेपाठी श्वान । सांडोनि अभिमान तपाचाही ॥५॥
नामा म्हणे कोण तयासी टाळील । प्रारब्ध करील तेंचि खरे ॥६॥
