साक्षात्कार होता । स
2192.
साक्षात्कार होता । साच बद्धता नुरे तत्त्वता ॥१॥
माझा होता अनुभव । कल्पनेसी नुरे ठाव ॥२॥
माझे देखता चरण । संसारचि नुरे जाण ॥३॥
माझी भक्ति करिता । दोष नुरेचि सर्वथा ॥४॥
सर्वांठायीं मी वसे । एकाजनार्दनी भेद नासे ॥५॥