वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 225. ह्याळसेन कथा (द्रोण पर्व)

तो खवळला महाबाहो । र

🙏 4. संत नामदेव · ABH-083897 · अभंग क्र. २१६९

2169.
तो खवळला महाबाहो । रथ घोडिया एक चि घावो । फेडीतु वैरियाचा ठावो । महावीरू ॥२२६॥
मागे म्हाळसेनाचे वीर । तेहि भंगिले कौरवांचे भार । थोर होताहे हल-कल्लोळ । रणामाजी ॥२७॥
पुढे पळे कौरवसैन्य । पाठी धांवे ह्माळ-सेन । थोर होताहे कंदन । कौरवांचे ॥२२८॥
तंव दुर्योधनु बोले । गुरु तुह्मी विचारिलेम । की हा मेलिया भले जाले । सकळिकांचे ॥२२९॥।
दुर्यो-धनाचे नांवे । तेचि पांडव जाणावे । जरी हा न वांचला जिवे । रणामाजी ॥२३०॥
मज घातु जालियावरी । तुह्मी वोळंगावे माझे वैरी । ऐसे खडतर उत्तरी । खोंचला द्रोणु ॥२३१॥
ह्मणे तू होसी कुळहीनू । म्हणोनि बोलतोसी उणे । तुझे तुज साजे बोलणे । बोलतो मज ॥२३२॥
गांधारीया सहजा सांगितले । तेंचि आजी आठवले । तुझे प्रसूतसमयी शब्द झाले । जंबुकाचे ॥२३३॥
तैंच म्या वर्तिले वर्तन । कुळक्षयो याचेन गुण । तेंचि आले वचन । पुढे देखा ॥२३४॥
अरे तुझीये कारनी । येथे अनाथे पाडिली रणी । शेवटी पुढे निरवाणी । तूंहि जासील प्राणा ॥२३५॥
हा सर्वगतु श्रीहरी । सर्वत्र सर्वांच्या उदरी । एकमेका करूनि वैरी । संहारावो ॥२३६॥
आमुचे सहजी वृद्धपणे । यावरी कीर्ति जिणे । तरी तुमचा का जी प्राण वेंचणे । सत्य जाण ॥२३७॥
इतके बोलेनि वचन । गुणी लविला रुद्रबाण । पाचारिला ह्याळसेन । तये वेळी ॥२३८॥
राख राख आपलिया प्राणा । म्हणोनी सोडिले रुद्रबाणा । तेणे तेजे गगना । उजेडु जाला ॥२३९॥
ते ह्माळ-सेने देखोनी नयनी । वैष्णवास्त्र लविले गुणी । तेणे नेले पिटोनी । रुद्रशस्त्राते ॥२४०॥
तेजे तेज हरपले । शस्त्रे शस्त्र विलया गेले । तंव ह्माळसेने पाचारिले । द्रोणाचार्यासी ॥२४१॥
मग हाणितला पांच बाणी । चारी वारू पाडिले रणी । सारथी बाणे खडतरोनी । पडला देखा ॥२४२॥
ते वेळी द्रोणु विरथू जाला । आणिका रथावरी गेला । गदाघाते चूर्ण केला । तोही रथू ॥२४३॥
मग पळतसे चर-णचाली । थोर होताहे मारी । मग द्नोणु विचारी । मनामाजी ॥२४४॥
आता करावे निर्वाण । नाही तरी नाही जिणे । मग काढिला बाण । निर्वाणींचा ॥२४५॥
ब्रह्मअस्त्र लविले गुणी । तयासी प्रार्थना करुनी । वैरियासी संहारुनी रणी । क्षणामाजी ॥२४६॥
पळत पळता सोडिला बाणू । तेणे व्यापिले गगन । ते ह्माळसेनाचे सैन्य । देखते जाले ॥२४७॥
वरुषती शस्स्त्रधारी । शर पडती धरणीवरी । परी ह्माळ-सेनाचे शरीरी । धाकु नाही ॥२४८॥
गदाघातु जेथ देत । वारु मारी मोडी रथ । उलंडले मदोन्मत । गिरी जैसे ॥२४९॥
कोटि सूर्यांचा प्रकाशू । तैसा गगनी आयासू । करावया प्राणनाश । वैरि-यांचा ॥२५०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग