वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 229. धृवचरित्र

चालिले बाळक रुदन करी

🙏 4. संत नामदेव · ABH-083949 · अभंग क्र. २१८८

2188.
चालिले बाळक रुदन करीत । देखोनी गांवांत हाहा: कार ॥१॥
पाहा हे रायाने मांडिले अनुचित । कासया तो भ्रांत झाला नेणो ॥२॥
देवोनिया रत्न घेतला चिंचोका । दिला कवडी एका चिंतामणी ॥३॥
कामधेनु नेधे पोशीले बोकड । अस्पदे माकड पाळावया ॥४॥
कल्पतरु मोडी शेता कुंपण करी । तैसी झाली परी आजीची हे ॥५॥
नामा म्हणे तिचा मोह हा दारुण । राजा ती आधीन झाला तैसा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग