वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

करिता होय होय चित्तच

🙏 3. संत तुकाराम · ABH-077928 · अभंग क्र. २१९२

2192.
करिता होय होय चित्तचि नाही । घटापटा काही करू नये ॥१॥
मग हालत चि नाही जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥धृपद॥
साहत चि नाही काही पाकुळले । उगल्या उगले ढळत आहे ॥२॥
तुका म्हणे तरी बोलावे झांकून । येथे खुणे खूण पुरते चि ॥३॥

अर्थ :
काही लोक वेदांत शिकत असतांना केवळ हो समजल हो समजल असे म्हणतात परंतु त्यांचे चित्त त्याठिकाणी नसते मग जर समजत नसेल तर घट आणि पटाच्या नादालाच लागायच नाही. मग आपण हो हो केले की सांगणाराही आपल्या जवळून हलतच नाही त्यापेक्षा अध्यात्म केला तर देवही आपल्या जवळून हालणार नाही घट पटाच्या नादी लागले की व्यर्थ शिणच आपल्याला शिनवत असतो. आपले मन चंचल असेल तर देव तेथे राहत नाही आणि मन जर स्थिर असेल तर देव तिथून हलत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात अध्यात्म शास्त्रांमध्ये आपले कितीही ज्ञान असेल तरीही ते झाकूनच बोलावे आणि बोलणे कसे असावे तर अधिकार संपन्न व्यक्ती पुढे केवळ खुणेनेच बोलावे म्हणजेच मर्‍यादेने बोलावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग