बहु मतें बहु मतांतरे
2168.
बहु मतें बहु मतांतरें । आम्हा निर्धारे नावडती ॥१॥
अविनाश आहे सुख पंढरीसी । यालागी तयासी न विसंबो ॥२॥
विठ्ठल देवो जेथे उभे । पुढे शोभे पुंडलीक ॥३॥
एकाजनार्दनी भ्रमर । कमळ परिकर विठोबा ॥४॥