आता मज तारी । वचन हे
2178.
आता मज तारी । वचन हे साच करी ॥१॥
तुझे नाम दिनानाथ । ब्रिदावळी जगविख्यात ॥धृपद॥
कोण लेखी माझ्या दोषा । तुझा त्रिभुवनी ठसा ॥२॥
वाया जाता मज । तुका म्हणे तुम्हा लाज ॥३॥
अर्थ :
देवा तु आता मला या भावनातून तार आणि मी भक्तांना तारणारा आहे हे तुझे वचन सत्य कर. देवा तुझे नाम दीनानाथ आहे ही तुझी ब्रिदावळी सर्व जगविख्यात आहे. अरे देवा तु महादोष नाहीसे करणारा आहेस असा ठसा त्रिभुवनात गाजलेला आहे मग त्या महादोषा पुढे माझे दोष तरी किती आहेत? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझा भक्त असूनही वाया गेलो तर त्याची लाच तुम्हालाच.
