मातेलागी पुसे पिता म
2182.
मातेलागी पुसे पिता माझा कोण । ते म्हणे वचन ऐक बाळा ॥१॥
क्षिराब्धीपासोनी चंद्रमा का जैसा । होसी तूंहि तैसा राजपुत्र ॥२॥
तरी का आम्हा त्याने टाकीले निवडोन । संचित ते म्हणे पूर्वकर्म ॥३॥
जाऊ भेटू त्याला बोलवू का मागे । नको बा तुज काय उणे असे ॥४॥
नामा म्हणे ऐसा दोघांचा संवाद । झाला मनी खेद सुमतीसी ॥५॥
