पतीव्रता मोठी सुमती
2180.
पतीव्रता मोठी सुमती सुंदरी । वाचेने उच्चारी गुणदोष ॥१॥
संचित क्रियमाण वाहोनिया सकळ । प्रारब्ध केवळ सारीतसे ॥२॥
गाते हरिनाम अखंड अंतरी । प्राणेश्वरावरी भाव निका ॥३॥
बाळकाची कळा ठाउकी तियेसी । जीवे प्राण पोसी निरंतरा ॥४॥
नामा म्हणे काळ कल्याणाचा तिला । म्हणोनी जाहला हरिभक्त ॥५॥
