वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 229. धृवचरित्र

राजा म्हणे बाळा देतो

🙏 4. संत नामदेव · ABH-083928 · अभंग क्र. २१९८

2198.
राजा म्हणे बाळा देतो पंच ग्राम । तो म्हणे आत्माराम देता आहे ॥१॥
आशा सांडोनिया निराश जाहला । शरण देवाला जावयासी ॥२॥
चतुर्थ भागाने राज्य घे वांटोनी । म्हणे चक्रपाणी देता आहे ॥३॥
अर्धे भूमंडळ घेईंरे उदारा । म्हणे विश्वंभरा लाज माझी ॥४॥
संपूर्ण हे महि तुजचि वोपीन । म्हणे नारायण सांभाळील ॥५॥
नामा म्हणे ऐसा गणीना भूपाते । निश्चय चितांत एक झाला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग