वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 229. धृवचरित्र

संकल्पाचा मळु नेत्री

🙏 4. संत नामदेव · ABH-083924 · अभंग क्र. २१९३

2193.
संकल्पाचा मळु नेत्री नीडारला । त्यालागी तो डोळा काय दिसे ॥१॥
जेथे देखो तेथे तोचि तो कोंदला । विश्वामाजी भरला विश्वंभर ॥२॥
मोठे थोर थोर तापसी नाडीले । कामाने वोढिले माघौतेची ॥३॥
वेदाचे पुनीत यज्ञशीळ सारे । झकवती बारे वास नेणे ॥४॥
दांभीक मगरी गीळिले सर्वांसीही । त्यालागी तो नाही ऐसा भासे ॥५॥
नामा म्हणे ऐसी बोलली जननी । बाळ मोठा ज्ञानी जाणवला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग