वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

नाम घेता कंठ शीतळ शर

🙏 3. संत तुकाराम · ABH-077891 · अभंग क्र. २१७४

2174.
नाम घेता कंठ शीतळ शरीर । इंद्रिया व्यापार नाठवती ॥१॥
गोड गोमटे हे अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्ते ॥धृपद॥
प्रेमरसे जाली पुष्ट अंगकांति । त्रिविध नसती ताप क्षणे ॥२॥
तुका म्हणे तेथे विकाराची मात । बोलो नये हित सकळांचे ॥३॥

अर्थ :
एकदा की हरीचे नाम कंठाने घेतले तर शरीर आणि कंठ दोन्ही शितळ होतात आणि इंद्रियांना स्वत: व्यवहार करण्याची आठवण राहत नाही. असे हे हरीचे नाम गोड गोमटे आणि अमृतापेक्षाही वरचढ आहे म्हणूनच तर माझ्या चित्ताने ते हरीचे नाम घेण्याचा दृढ निश्चय केला आहे. हरी च्या नामाने व त्याच्या प्रेमरसाने माझे शरीर तेजस्वी पुष्ट झाले आहे. आणि नाम उच्चारताच त्रिविध पाप क्षणांमध्ये नाश पावतात. तुकाराम महाराज म्हणतात जे भक्त नाम घेतात त्यांच्या ठिकाणी विकाराच्या गोष्टी तर बोलुच नये परंतु जे कोणी नांव घेतात त्या सर्वांचे हितच होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग