संतांचिया पायी हा मा
2171.
संतांचिया पायी हा माझा विश्वास । सर्वभावे दास झालो त्यांचा ॥१॥
तेचि माझे हित करिती सकळ । जेणे हा गोपाळ कृपा करी ॥धृपद॥
भागलिया मज वाहतील कडे । त्यांचियाने जोडे सर्व सुख ॥२॥
तुका म्हणे शेष घेईन आवडी । वचन न मोडी बोलिलो ते ॥३॥
अर्थ :
संतांच्या पायावर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळेच तर मी त्यांचा सर्वभावे दास झालो आहे. जेणेकरून गोपाळ माझ्यावर कृपा करेल अशाच प्रकारचे सर्व हित हे संत माझे करत आहेत. मी जर परमार्थामध्ये थकलो तर ते संत मला लहान मुलासारखे कडेवर घेतात आणि पुन्हा परमार्थ करण्यास प्रोत्साहन देतात. आणि त्यांच्या कृपेनेच तर सर्व मला सुख प्राप्त होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे उचिष्ट मी आवडीने सेवन करेल आणि त्यांनी केलेली आज्ञा मी कधीही मोडणार नाही.
