तरी तुम्ही कालच्या द
2168.
तरी तुम्ही कालच्या दिवशी । रणी वधिले अभिमन्यूसी । ते मूळ आहे तुह्मांसी । यमयातना ॥२०१॥
असो तुम्हासी काय सांगणे । तुह्मी ठाईंहूनि कपट करणे । तैसेंच भोगाल पतने । सत्य जाणा ॥२०२॥
ऐसे बोलोनी घेतले बाण । तोडिले तयाचे संधान । तंव आणिक आले तीव्रपणे । तेंहि तोडिले ॥२०३॥
तितकीया वीरांचे संधान । एकलचि सांवरी त्राण । जैसे नपूंसकाचे जिणे । निरर्थक ॥२०४॥
मग एक वेळा करुनी । रथा-भोंवता वेढा घालुनी । मग वरुषताती बाणी । जलधारा जैसे ॥२०५॥
कर्णु ह्मणे देख देख । हे सांवरी माझे लक्ष । म्हणोनि विंधिले धनुष्य । तुटले शीत ॥२०६॥
तंव ते वज्रापासाव कठारे । काय करी कर्णाचा शर । मांडी देउनी महावीर । चढविले सीत ॥२०७॥
मग घेउनी गदेते । कर्ण हाणितला अव्हाटे । कूट करूनि रथांत । पाडि-ला भूमी ॥२०८॥
अश्वत्थामा तये क्षणी । चारी वारु खिळले बाणी । ते देखोनिया नयनी । तोडिले वीरे ॥२०९॥
तयाच्या संधाना आंत लखलखीत बाण सात । अश्वत्थामा करूनि विरथ । पाडिला रणी ॥२१०॥
तयेच वेळी कृपाचारी । आखु छेदावया दाखवी दाही शरी । येता देखिले दुरी । म्हाळसेंने ॥२११॥
ते बाणे बाण तोडिले । मग कृपाचारी ते लक्षिले । मूर्च्छित पाडिले । मोडिला रथू ॥२१२॥
तंव दु:शासनु पातला । तेणे ध्वजास्थ देखिला । तो वज्रापासावो घडि-ला । केवी तुटे ॥२१३॥
मग सोडिला बाण । ह्लदयी विंधिला दु:शा-सन। पडला मुरकुंडी येऊन । तये वेळी ॥२१४॥
मग ह्मणे जी जी श्रीगुरू । तुह्मी का न करा हाती येरू । एवढा वाटीवेचा बडिवारू । वृथा जातु ॥२१५॥
आवेशोनी द्रोणाचारी । म्हाळसेनु विंधिला दाही शरी । तंव दृम दुहाकारी । साहे माते ॥२१६॥
तंव पावला सबळू । झणे होसी बरळू । आता करीन हलकल्लोळू । वीरा तुज ॥२१७॥
कर्णू अश्वत्थामा पावला । कृपाचारी विकर्ण आला । शैल्य सोमदंतु धाविन्नला । थोर क्रोधे ॥२१८॥
ते देखोनिया वैरी । जैसा सिंह गजावरी । मग गदा घेऊनिया करी । उतरे चरणी ॥२१९॥
वीर-वाहो सबळ वाहानू । वीरसेनू दळभंजनू । अग्निकेतु रण मर्दनू । पावले वेगी ॥२२०॥
शरधारी वरुषती । तयाची संधाने तोडिती । म्हाळसेनु करील ख्याती । महा वीरेसी ॥२२१॥
कर्णु गदे करून हाणि-तला । विकर्णु क्षितीवरी पाडिला । अश्वत्थामा पावला । चरण चाली ॥२२२॥
पुढा देखोनी कृपाचारी । तयाते घावो देवोनी शिरी । सबळासी केला परी । ते सांगवेना ॥२२३॥
द्रुपदासी धरुनी चरणी । तयासी भवंडिले गगनींरिथेसी दिधला टाकोनी । शैल्यावरी ॥२२४॥
तंव पुढा देखिला सोमदंतू । तयाचा मोडूनिया रथू । भूरिश्रवाचा पुरुषार्थू । भंगिला तेणे ॥२२५॥
