वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 225. ह्याळसेन कथा (द्रोण पर्व)

ऐसे जाणत मनी । पांडव

🙏 4. संत नामदेव · ABH-083892 · अभंग क्र. २१६७

2167.
ऐसे जाणत मनी । पांडवा सारथी चक्रपाणी । तरी कासया निर्वाणी । येता तुह्मी ॥१७६॥
तया सारथी देवरावो । तो पांडवांसी देईल जयो । कौरवांसी करी क्षयो । हे निभ्रांत जाणा ॥१७७॥
धरूनि मच्छाचा वेषू । दैत्य वधिला तो शंखू । कूर्मवेषे भूमि गोळकू । धरिला पृष्टी ॥१७८॥
जै वराहरूप नटला । तो हिरणाक्षु दैत्य वधिला । हिरण्यकश्यपू वधिला । नरसिंहवेषे ॥१७९॥
जे खुजे रूप धरूनि । बळी पाताळी घालूनि । पृथ्वी नि:क्षेत्री करुनी । परशरामे ॥१८०॥
विरोचनाची होऊनि नारी । मग तो निर्दाळिला वैरी । ऐसा कपटी श्रीहरी । नेणसी राया ॥१८१॥
पहिलचि घेतला विचारू । तरी कासया होता संहारू । भीष्म देवासारखा वीरू । कासया पडता ॥१८२॥
कासया पडता लक्ष्मण । जयद्रथा होते का निर्वाण । ऐसे तुझे मूर्खपण । दुर्योधना ॥१८३॥
आता सांगसी विचारू । तोचि आम्ही करू । वांया करितोसी संहारू । महावीरांचा ॥१८४॥
पाहे तुझिये कारणी । वीर पडती रणी । ऐसी तुझी करणी । दुर्योधना ॥१८५॥
ऐसे द्रोणगुरु बोलिला । दुर्योधनु काळवंडला । उगाची तो राहिला । मौनरूपी ॥१८६॥
तंव बोलिला कृपाचारी । गूढा असे याच्या शरीरी । श्रीगुरु तुमच्या उत्तरी । न बोले कांही ॥१८७॥
तंव बोलिला गुरुरावो । तुवा का धरिला मौनभावो । जो सांगसी उ-पावो । तोचि करू ॥१८८॥
तंव बोलिला दुर्योधनू । या वीरासी संहारून । यामागे जीवू की मरून । भलतेंचि घडो ॥१८९॥
तंव द्रोणू बो-लिला रायासी । ब्रह्मशस्त्र आहे मजपाशी । येणे शस्त्रे अर्जुनाशी । घातु असे ॥१९०॥
हे शस्त्र गा दुर्योधना । घातुक याचिया प्राणा । उदैक पार्थाचिया प्राणा । घेऊ आम्ही ॥१९१॥
तंव दुर्योधन ह्मने गुरूसी । यापुढा जेव्हा वांचसा । मग अर्जुनाते वधिसी । समरांगणी ॥१९२॥
भ्रस्तुत चुकवावे मरणारात्री आडते कायसे विघ्नाहे कार्य अवश्य करून । यासी वधावे ॥१९३॥
श्रीगुरु बोले उत्तरी । अभिमन्यु मारिला जया परी । तैसोंचि करावे वीरी । आजी देखा ॥१९४॥
मग एकवटले वीर । चालिला कौरवांचा भार । शत्रा अस्त्री अंधकार । पडिला तेथे ॥१९५॥
ते देखिएल ह्माळसेने । तेणे पचारिला द्रोण । तुह्मा लाज नाही मी ह्मणे । पळता रणी ॥१९६॥
वीर ह्मणविता भारथीचे । थोर पुरुषार्थ तुमचे । महत्त्व न राखा नांवाचे । पळता रणी ॥१९७॥
क्षेत्री झुंजता रणी । पाठी देउनी पळे प्राणी । तो पडे यमवदनी । कोटि वरुषे ॥१९८॥
नातरी पळतियासी मारी । की नि:शस्त्रिया अव-धारी । की शरणागतासी वधारी । तो अप्रयोजकू ॥१९९॥
एकवळा की करुनी । एकलियासी वधिती रणी । तयासी होय यमजाचणी । चंद्रार्क वरी ॥२००॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग