सापत्न माउली होती वो
2185.
सापत्न माउली होती वोंवरींत । ऐकीला भावार्थ दोघांचाहि ॥१॥
बुद्धीचा कांतर बुब्दुदला मोठा चावीतसे ओंठा खेद बहु ॥२॥
निघुनी ते वेगी आली रायापाशी । म्हणे या पोरासी का घेतले ॥३॥
मांडी बैसवीसी लाडाने बोलवीसी । पाहू आता कैसी लोचनी मी ॥४॥
शरीर त्यागावे की त्यासी मारावे । हेंचि जीवे भावे वाटे मना ॥५॥
मागेंपुढे कांही न पाहे द्दष्टीस । लोटिले बाळक पाये तिने ॥६॥
नामा म्हणे राजा तियेचा अंकिला । झाला चाकाटला आपुल्या ठायी ॥७॥
