मधुवन चांगले लोचनी द
2197.
मधुवन चांगले लोचनी देखीले । तेथे मन रंगले बाळकाचे ॥१॥
राहू येथे करू देवाची प्रार्थना । म्हणोनिया मना बोधवीत ॥२॥
सरोवर दिव्य त्यामाजी कल्हारे । भोंवताले मयुर नाचताती ॥३॥
साउली सुंदर सुमने मनोहर । देवाचा विहार तये ठायी ॥४॥
नामा म्हणे ऐसा निश्चय नेमून । ध्रुव तये वनी स्थिरावला ॥५॥
