सर्वाठायीं ज्याची सत
2170.
सर्वाठायीं ज्याची सत्ता । तो भक्ताधीन तत्त्वता ॥१॥
ज्याची आज्ञा प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण ॥२॥
आज्ञा ज्याची धडफुडी । पर्वत बैसका न सोडी ॥३॥
ज्याचे आज्ञेविण । पवनु न चाले एक क्षण ॥४॥
जो सर्वांसी आधार । एका जनार्दनी विश्वभंर ॥५॥
