वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 229. धृवचरित्र

केला नमस्कार मातेला

🙏 4. संत नामदेव · ABH-083929 · अभंग क्र. २१९४

2194.
केला नमस्कार मातेला उठोनी । निघाला तेथुनी लागवेगे ॥१॥
वनी बैसोनिया धरोनी विश्वास । आळवावा ईश ऐसे चित्ती ॥२॥
हाक मारीत मागे माउली चालली । तियेसवे बोली करीना ते ॥३॥
एकाकी तो नीट चालीला त्वरेने । पाहोंनिया जन स्तब्ध झाले ॥४॥
बोलविता कांही बोलेना कोणासी । अघोर स्थळासी प्रवेशला ॥५॥
मातेसी ठाउके तयाचे अंतर । म्हणोनी ते स्थिर झाली ठाई ॥६॥
नामा म्हणे पूर्व पुण्याचिया बळे । मन त्याचे झाले स्थीर तेथे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग