नगरी नरनारी समस्तही
2195.
नगरी नरनारी समस्तही । म्हणती झाले कांही राजयाला ॥१॥
बाळ ते केवढे धाडीले वनासी । याचीया धैर्यासी दुजा नाही ॥२॥
मागे बहु झाले नाही हे देखीले । हे तो नव्हे भले विचारिता ॥३॥
सर्वांदिकी त्यासी सांगितली वृत्त । कांरे तू निवांत बैसलासी ॥४॥
नामा म्हणे राजा ध्रुवापाठी गेला । कायतो बोलीला ऐका त्यासी ॥५॥
