वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 229. धृवचरित्र

न कळता मुलांसंगे मी

🙏 4. संत नामदेव · ABH-083945 · अभंग क्र. २१९०

2190.
न कळता मुलांसंगे मी खेळत । गेलो सभेआंत राजयाच्या ॥१॥
काय सांगो माये जाहला अपमान । तेणे माझे मन । दुखावले ॥२॥
माते प्रेमभावे राये आळवीले । मांडी बैसवीले सन्मानेशी ॥३॥
आली आकस्मात्‌ दुर्धर कोपोन । लांस की ते कोण मी तो नेणे ॥४॥
ताडोनिया पायी मज उठविले । निघालो मी सहजे तत्‌क्षणी ॥५॥
कोणी नुठवी ऐशाठायी म्या बैसावे । ते कोणा मागावे सांग माये ॥६॥
नामा म्हणे दिसे पाहाता बाळक । ज्ञानची निष्टंक मुसावले ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग