रंगी रंगे रे श्रीरंग
2167.
रंगी रंगे रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगे ॥१॥
शरीर जायांचे ठेवणे । धरिसी अभिळास झणे ॥धृपद॥
नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥२॥
अंतकाळींचा सोइरा । तुका म्हणे विठो धरा ॥३॥
अर्थ :
अरे मानवा श्री रंगाच्या रंगात रंगून जा पतंग जसा दिव्याला भुलुन मरण पावतो तसा तु विषयाच्या नादी का लागला आहेस? अरे हे शरीर म्हणजे जाण्याचे ठेवणेच आहे ते जाणारच आहे त्यामुळे त्याविषयी तू अभिलाषा धरू नको. अरे हा संसार हा द्रव्य दारा आधी परिवार हा क्षणभंगुर आहे हा तुझा नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात अरे हा विठोबा तुमचा अंत काळीचा सोयरा आहे त्यामुळे तुम्ही त्याला हृदयात धरा.
