देव गुज सांगे भक्ता
2185.
देव गुज सांगे भक्ता । अंकित अंकिता तुमचा मी ॥१॥
तुम्हालागीं अवतार । धरणे साचार मजलागी ॥२॥
तुम्हा न यावे उणेपण । माझे थोरपण कोण वानी ॥३॥
म्हणोनि गळा घालीं मिठी । एका जनार्दनी पडली गांठी ॥४॥