वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

देव प्रसन्न जाला माग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088008 · अभंग क्र. २१६९

2169.
देव प्रसन्न जाला माग म्हणे वहिला । भक्त घरोघरी विचार पुसो गेला ॥१॥
भाव की भ्रांति आळस की भक्ती । विचारुनी व्यक्ति ठायी ठेवा ॥२॥
अरे हे गुह्मा गोप्य कुडे करु नये उघडे । तरी द्वारोद्वार पुसुं जाय वेडे ॥३॥
विलंब करिता पहा हो उदास जाला देवो । निवालिया खंती न घाली म्हणे घावो ॥४॥
शिकविले नायकती वरिलें ते करिती । आपुलेनि कर्मे आपण गुंतताती ॥५॥
एकाजनार्दनी शीतळ भाव । आळसाचें देव दुर्‍हाविला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग