वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

संतसंगे याचा वास सर्

🙏 3. संत तुकाराम · ABH-077846 · अभंग क्र. २१९३

2193.
संतसंगे याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तीमंत ॥१॥
घालूनिया काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरी वास दिला ॥धृपद॥
आपुलेसे जिंही नाही उरो दिले । चोजविता भले ऐसी स्थळे ॥२॥
तुका म्हणे नाही झांकत परिमळ । चंदनाचे स्थळ चंदन चि ॥३॥

अर्थ :
जेथे संत संग आहे तेथे देव हा सर्व काळ वास करत असतो आणि संतांच्या संगे हा मूर्तिमंत सगळीकडे संचरून असतो. संतांनी संपूर्ण काळ म्हणजे कळीकाळाला बाहेर हाकलून लावले आहे आणि अंतकरणात देवाला स्थान दिले आहे. संतांनी आपल्या देहामध्ये अहम भावाला अजिबात उरू दिले नाही व असे संत जेथे वास करून राहतात त्या स्थळांचा शोध घेणे केव्हाही चांगलेच. तुकाराम महाराज म्हणतात चंदन कितीही झाकून ठेवले तरी त्याचा सुगंध केव्हाच झाकल्या जात नाही चंदन ज्या ठिकाणी आपण ठेवतो ते संपूर्ण स्थळच चंदनासारखे होते कारण त्याचा सुगंध त्या स्थळाला लागला जातो त्याप्रमाणे संत जेथे वास करतात ते स्थळ पवित्र व निर्मळ होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग