पूर्वजज्मी त्याने सा
2192.
पूर्वजज्मी त्याने साधियेला योग । कांहींसा वियोग झाला होता ॥१॥
कैसा नेटेपाटे उन्मखे फुटला बालपणी त्याला ज्ञाम झाले ॥२॥
विरक्ती वोळगे पाइक होउनी । शांती पुढारुनी माळ घाली ॥३॥
शमदम अंकित पुढारले बळे । योग तो अढळ सदा तेथे ॥४॥
मान गर्व मनाचा खुटला विचार । थिता अहंकार तोहि गेला ॥५॥
नामा म्हणे बाळ बोलिले जाणोनी । माउली हांसोनी काय बोले ॥६॥
