वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

लाघवी सूत्रधारी दोरी

🙏 3. संत तुकाराम · ABH-077988 · अभंग क्र. २१७२

2172.
लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संहारी नानापरिची लाघवे ॥१॥
पुरोनि पंढरिये उरले भक्तीसुखे लांचावले । उभे चि राहिले कर कटी न बैसे ॥धृपद॥
बहु काळे ना सावळे बहु कठिण ना कोंवळे । गुणत्रया वेगळे बहुबळे आथीले ॥२॥
असोनि नसे सकळांमधी मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधि तुका म्हणे श्रीविठ्ठल ॥३॥

अर्थ :
हा देव मोठा चमत्कारिक आहे सृष्टी उत्पन्न करतो आणि सर्वांचे संचित कर्माची दोरी हातात घेऊन सर्वांना चतुरतेने नाचवत असतो. सृष्टी उत्पन्न करून त्याचे पालन करून पुन्हा त्याचा संहार करण्याचे विविध प्रकारचे चमत्कार तो करत असतो. विविध प्रकारचे चमत्कार करून हा देव सर्वत्र व्यापक राहून पंढरीत उरला आहे आणि भक्ती सुखासाठी लाचवलेला आहे. त्यामुळे तर हा देव कर कटेवर ठेवून उभा राहिलेला आहे तो कधीही बसत नाही. हा देव फार काळा नाही किंवा फार सावळाही नाही फार कठीण नाही किंवा फार कोवळा म्हणजे मृदू नाही तो सत्त्व, रज, तम या तीन गुणापेक्षा वेगळा असून फार बलवान आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो सर्वांमध्ये असूनही नसल्यासारखाच आहे मनाला आणि बुद्धिलाही देखील तो समजत नाही. असा हा माझा स्वामी कृपा निधी श्री विठल आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग