सत्ताबळे येतो मागता
2191.
सत्ताबळे येतो मागता विभाग । लावावया लाग निमित्य करू ॥१॥
तुझी ऐसी मुखे करू उच्चारण । बोले नारायण सांपडवू ॥धृपद॥
आसेविण नाही उपजत मोहो । तरि च हा गोहो न पडे फंदी ॥२॥
तुका म्हणे आता व्हावे याजऐसे । सरिसे सरिसे समागमे ॥३॥
अर्थ :
आपल्या भक्तीच्या सत्तेच्या बळावर देवाचे कोणतेही लक्षण आपल्याला मागितल्या बरोबर मिळू शकते आणि त्याच निमित्ताने देवासी संबंध जोडता येईल असे आपण काहीतरी करू. आपण आपल्या मुखाणे अस म्हणू, हे नारायणा आम्ही तुझेच बालके आहोत ना असेच लाडाने बोलून बोलून याला आपण वश करू. अपेक्षेविना मोह उत्पन्न होत नाही जसे स्त्रीची अपेक्षा असेल तर मग तिचा नवरा इतर कोणत्याही स्त्रीच्या फंदात पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता आपण या देवासारखे होऊ आणि त्याच्याच बरोबरीला राहून त्याची संगती करू.
