वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

पुष्ट कांति निवती डो

🙏 3. संत तुकाराम · ABH-078007 · अभंग क्र. २१९४

2194.
पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहंळे श्रीरंगी ॥१॥
अंतर्बाही विलेपन । हे भूषण मिरवू ॥धृपद॥
इच्छेऐसी आवडी पुरे । विश्वंभरे जवळी ॥२॥
तुका करी नारायण । या या सेवन नामाचे ॥३॥

अर्थ :
श्रीरंगाच्या दर्शनाने शरीर पुष्ट होते, शरीरावर कांती येते, डोळ्याची भूक भागते आणि विविध प्रकारचे सुख सोहंळे साजरे होतात. त्यामुळे आम्ही आमच्या अंतर बाह्य रंगात हरीच्याच सुख सोहंळ्याचे विलेपण म्हणजेच उटी लाऊन त्याचेच भुषण मिरवीत आहोत. त्या विशंभरा जवळ आपण आपल्या आवडीचे जी इच्छा बोलू ती इच्छा पूर्ण होत असते. तुकाराम महाराज म्हणतात मला जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मी नारायण या नावाचे सेवन करत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग