पाचारिले ध्रुवाजवळी
2184.
पाचारिले ध्रुवाजवळी त्या रायाने । जाणोनी सन्माने आला पाशी ॥१॥
संतोष तो कांही बोलवेना वाचे । उदार प्रेमाचे झळंबती ॥२॥
अंकी बैसविता कैसा तो शोभला । कोंदण रत्नाला जयापरी ॥३॥
चुंबोनिया मुख पुसतो मंजूळ । मी कोण ते न कळे तुज कांही ॥४॥
तो म्हणे आहेसी तात तू निष्ठुर । आम्हांसी बाहेर ठेवियेले ॥५॥
राजा म्हणे काय जाहाले तयासी । होसी तू राज्यासी अधिकारी ॥६॥
नाम म्हणे ऐसा दोघांचा उद्नार । लोटो आला पूर आनंदाचा ॥७॥
