वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

तरि का पवाडे गर्जती

🙏 3. संत तुकाराम · ABH-078331 · अभंग क्र. २१८८

2188.
तरि का पवाडे गर्जती पुराणे । असता नारायण शिक्तहीन ॥१॥
कीर्तीविण नाही नामाचा डांगोरा । येर का इतरा वाणीत ना ॥धृपद॥
तरि च म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखी गुणे ॥२॥
चांगलेपण हे निरुपायता अंगी । बाणले श्रीरंगा म्हणऊनि ॥३॥
तरि च हा थोर सांगितले करी । अभिमान हरीपाशी नाही ॥४॥
तुका म्हणे तरि करिती याची सेवा । देवापाशी हेवा नाही कुडे ॥५॥

अर्थ :
हा नारायण जर शक्तीहीन असता तर पुरानाने त्याचे वर्णन एवढे गर्जुन का केले असते. एखाद्याच्या नामाचा महिमा मोठा असल्याशिवाय त्याची कीर्तिचा डांगोरा संपूर्ण विश्वात पसरत नाही, बर वेदाने केवळ देवाच्या नावाचा डांगोरा का केला असेल इतरांचा का नाही? देव स्वतः सुखी आहे आणि त्यांनी माझ्या जीवाला देखील सुखी केले आहे या गुणामुळेच मी देवाला चिरंजीव म्हणजे अमर आहे असे म्हणत आहे. खरोखरच या श्रीरंगाच्या ठिकाणी चांगलेपणा अतिशय बांदलेला आहे त्यामुळेच त्याचे वर्णन पुराणांनी केले आहे. हरीच्या ठिकाणी अभिमान नाही भक्तांनी कोणतेही काम सांगितले की तो लगेच करतो म्हणूनच तो थोर आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाला भक्तांचा केवळ हेवा आहे कुढिलपणा नाहि व या करताच भक्त हरिची सेवा करतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग