वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

दैन्य दुःख आम्हा न य

🙏 3. संत तुकाराम · ABH-078073 · अभंग क्र. २०६३

2063.
दैन्य दुःख आम्हा न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥
सर्व सुखे येती माने लोटांगणी । कोण यांसी आणी दृष्टीपुढे ॥धृपद॥
आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचे ॥२॥
आमचे मागणे मागो त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥३॥
तुका म्हणे पोटी सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आम्हा ॥४॥

अर्थ :
दैन्य आणि दुख आमच्या जवळ येत नाही आणि दोष्याची तर होळी होऊन ते जळून खाक होते. सर्व सुख हे लोटांगण घेऊन आमच्या पायाजवळ येतात परंतु त्याकडे कोण लक्ष देत असतो? कारण आमची आवडही संत समागम आहे आणि इतर काही म्हणाल तर ते केवळ विठोबाचे नाम आहे. आमची काही मागणी असेल तर आम्ही त्याला त्याची सेवाच मागू मोक्षाची कोणत्या अभाग्यला आवड आहे? तुकाराम महाराज म्हणतात सकल ब्रह्मांडनायक असा देव आम्ही आमच्या पोटात साठवलेला आहे त्यामुळे आता आम्हाला कोणत्याहि प्रकारचा कमीपणा म्हणजे न्युनपणा आहे?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग