मी माझे म्हणता अथ जो
2056.
मी माझे म्हणता अथ जोडिता साहिचक्र गेले |नळ नीळ मांधाता पुरुषार्थी सारिखे तेहि काळे ग्रासियले |कपिल महामुनि सिद्ध विचारिता सागरराये पे अंगा गेले |कुमार अंत:पुर सांडूनिया ते भक्तराज काय जाले रे ॥१॥
_संसार स्वप्न जाणुनिया शरण रिघे पंढरिया' राया रे ॥ धृ ॥दुंदुभिराये धर्म चालविला तेणे शांतिचा सागर म्हणविले |अजपाळ जंपाळ राजा दशरथ सूयंवंशी ते जन्मले ॥२॥
जळींचे तरंग जळींच निमाले नेणो तेथे काय जाले |रामलक्ष्मण भरतकत्रुध्न सांग पा ते काय जाले रे ॥३॥
सूर्यवंशी राजा हरिचंद्र जन्मला. स्वप्न तेणे काय साच केले |स्त्रीपुत्राते विकुनिया तेणे ब्राह्मणा सुखिय्रा पे केले |शिबी चक्रवर्तीने आपुले प्राण देऊनि जीव ते भक्तराज काय जाले रे ॥४॥
शरीराचे मुदृगले सामास कवण वेंचि कृषि भोजनासी आले |स्त्रीपुत्राते वेंचुनिया तेणे अतिथा सुखी केले |सत्त्व पहावया केलासींचा राणा कांतिपूर नगरी उजू ठेले |भश्रियाळ पोटींचे बाळक दिधले सांग पा ते काय जाले रे ॥५॥
कौरवा पांडवा अति दळ संग्राम अठरा अक्षोहिणि: रणासी आले |नववेळ नारायण आले गेले परी अकरा रुद्र गणतीसी आले |छपन्नकोटी यादवे ती कृष्ण भालुका तीर्थी निमाले |नामा म्हणे ऐसे कल्पनेचे अवघे परंपरी भजिन्नले ॥६॥
