कृपेचा कोंवळा रघुनाथ
2055.
कृपेचा कोंवळा रघुनाथ दास | धरीन त्याची कास सर्वभावे ॥१॥
सांडूनि सर्वे संगु होईन शरणागत | करिती मनोरथ पूर्ण माझे ॥२॥
|भवसिधूचा पार उतरोनि निर्धारी | त्यापरती सोयरी नाही सृष्टी ॥३॥
अंतरींचे गुज सांगती श्रवणी | अमृत संजीवनी रामनाम ॥४॥
तेणे त्रिविधताप हरती मनींचे | जाणती जीवींचे जाले कष्ट ॥५॥
तो जिवलग जननी परिस लोभापरु | सर्वस्व उदारु प्राणसखा ॥६॥
नामा त्याचे बळे झेळतु यमासी | रिघोनि पाठीसी केशवाच्या ॥७॥
