देखणा जाहलों देखणां
2064.
देखणा जाहलों देखणां जाहलों । देखणा जाहलों विठ्ठला ॥१॥
जन्ममरण विसरले । पाहता पाहणें हारपलें ॥२॥
तुटली आशापाश बेडी । हेचि जोडी जोडली ॥३॥
एका जनार्दनी देव । धरिला ठाव न सोडी ॥४॥
2064.
देखणा जाहलों देखणां जाहलों । देखणा जाहलों विठ्ठला ॥१॥
जन्ममरण विसरले । पाहता पाहणें हारपलें ॥२॥
तुटली आशापाश बेडी । हेचि जोडी जोडली ॥३॥
एका जनार्दनी देव । धरिला ठाव न सोडी ॥४॥