वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

आम्हा संगती नावडे का

🙏 4. संत नामदेव · ABH-082257 · अभंग क्र. २०६०

2060.
आम्हा संगती नावडे कांही | म्हणोनि जालो बा विदेही |दुःखमूळ संगतीचे पाई | आम्ही नव्हो या गांवींचे ॥१॥
आम्हा नाही रूप नांव | वस्तीसी नाही एक ठाव |मन घ्या इच्छेसी धांव | आम्ही नव्हो त्या गांवींचे ॥२॥
स्तान केले गंगातीरी | गंध लाविले पंढरपुरी |संध्या केली कृष्णातीरी | आम्ही नव्हो त्या गांवींचे ॥३॥
भिक्षा केली कोल्हापुरी | भोजन केले महाद्वारी |निद्रा केली माहुरी | आम्ही नव्हो त्या गांवींचे ॥ ४ |ऐसियाची संगत करी | त्याचे चरण हृदयी धरी |नामा म्हणे या संसारी | आम्ही नव्हो त्या गांवींचे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग