तेहतीस कोटींची केली
2050.
तेहतीस कोटींची केली सोडवण | तो हा राम जपून धरा वेगी ॥१॥
राघवाचे नाम वाचेसी उच्चारा | निजाचा सोयरा रामचंद्र ॥२॥
|सागरी ह्या शिळा तारिल्या अवलीळा | ब्रह्मयांची बाला उद्धरिली ॥३॥
!रावण कुंभकर्ण विदारिळे बाणी | दिधली राजधानी शरणागता ॥४॥
वाल्मिक भविष्य कथुनिया गेला | रामे पवाडा केला तिही लोकी ॥५॥
नामा म्हणे रामनाम हे दुलंभ | शिव स्वथंभ हेंचि जपे ॥६॥
