वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

संसार. सागरी रे माझे

🙏 4. संत नामदेव · ABH-082223 · अभंग क्र. २०५८

2058.
संसार. सागरी रे माझे माहेर पंढरपुरी |विठोबा बाप माझा माता रखुमाई सुंदरी ॥१॥
पुंडलिक भाऊ माझा तोहि नांदे बरव्यापरी |सासुरे दुबळ भारी मज मोकलिले दुरी ॥२॥
सुखदुःख कवणा सांगू माझे माहेर पंढरपुरी ॥ धृ० ॥
भ्रतार निष्ठुर वो काम क्रोध दोघे दौर |आश्या हे सासू माझी ते मज गांजितसे थोर ॥३॥
तृष्णा हे नणंद सखी तिने व्यापियेले घरी |भक्ति हे माझी भगिनी ते मज होईल निर्धारी ॥४॥
वर्षे महिने दिवस घडिया वाट पाहे अजुनी |देहामाजी करिती देखा न्यावया न पवे कोणी ॥५॥
गर्जेंद्र हरिश्चंद्र त्यासी सोडवाया आला |प्रल्हाद अंबक्तषि तिही तुझा धांवा केला ॥६॥
उपमन्यू दुध मागता क्षीरसागरू दिला |गजेंद्र अजामेळ त्यांच्या सत्त्वा तू पावला |नामया विष्णुदास गीती गोविद गाईला ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग