वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

जाणे अंतरिचा भाव । त

🙏 3. संत तुकाराम · ABH-077898 · अभंग क्र. २०४४

2044.
जाणे अंतरिचा भाव । तोचि करितो उपाव ॥१॥
न लगे सांगावे मांगावे । जीवे भावे अनुसरावे ।
अविनाश घ्यावे । फळ धीर धरोनि ॥धृपद॥
बाळा न मागता भोजन । माता घाली पाचारून ॥२॥
तुका म्हणे तरी । एकी लंघियेले गिरी ॥३॥

अर्थ :
देव भक्ताच्या अंतरंगातील सर्व इच्छा जाणतो आणि त्या पूर्ण करण्याकरता वेगवेगळे प्रकारचे उपाय योजत असतो. देवाला आपल्या मनातील कोणत्याही प्रकारची इच्छा सांगावे किंवा मागावे लागत नाही तर तो आपल्या मनातील सर्व इच्छा जाणत असतो केवळ जीव भावाने त्याला शरण जावे. देवाजवळ केवळ धीर धरून राहावे मग तो आपल्याला अविनाश रुपी म्हणजे कधीही नाश न पावणारे असे फळ देतो. बाळाने जेवण मागितले नाही तरी आई त्याला बाहेरून बोलवून आणते आणि त्याला जेऊ घालते. तुकाराम महाराज म्हणतात एका पायाने चालणारे पागळे देखील पर्वताचे उल्लंघन करू शकतात ते केवळ हरी कृपेमुळेच.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग