सर्व सिद्धि मनोरथ ।
2063.
सर्व सिद्धि मनोरथ । पंढरीनाथ पहाता ॥१॥
दैन्य दरिद्र्य ते गेले । सुंदर पाउले पाहता ॥२॥
विषयांतें पळ सुटला । सुंदर सांवळां पाहता ॥३॥
काम क्रोध विलया गेले । श्रीमुख चांगले न्याहाळिता ॥४॥
एका जनार्दनी बरें जाहलें । सुंदर देखिले समचरणक ॥५॥
