अवघे हो ऐका अवघे श्र
2051.
अवघे हो ऐका अवघे श्रवणी | अवघेचि होऊनि एकचित्त ॥१॥
विठोबाचे नाम अवघेचि गोमटे | विचारी नेटेंपाटे आपुल्या मनी ॥२॥
अवधी हेचि क्रिया अवघे हेंचि कर्म | अवघ्या हाचि धर्म सत्य जाणा ॥३॥
अवघे हे सगुण अवघे हे निर्गुण | अवघे परिपूर्ण शुद्धबद्ध ॥४॥
अवघा हा आचार अवघा हा विचार | अवघा हा संसार सर्वकाळ ॥५॥
अवघा जेणे दुरी ठाके भवभ्रम | ते हे निरंतर नाम गाय नामा ॥६॥
