वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

आणिक मात माझ्या नावड

🙏 3. संत तुकाराम · ABH-078319 · अभंग क्र. २०५९

2059.
आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करू यासी पांडुरंगा ॥१॥
मुखा ते चि गोड श्रवणी आवडी । चित्त माझे ओढी तुझे पायी ॥धृपद॥
जये पदी नाही विठ्ठलाचे नाम । मज होती श्रम आइकता ॥२॥
आणिकाचे मज म्हणविता लाज । वाटे हे सहज न बोलावे ॥३॥
तुका म्हणे मज तू च आवडसी । सर्वभावेंविसी पांडुरंगा ॥४॥

अर्थ :
हे पांडुरंगा माझ्या जीवाला तुझ्या वाचून दुसरी कोणतीही गोष्ट आवडत नाही याला मी तरी काय करू? माझ्या मुखाला तुझे नाम घेणेच गोड वाटते कानाला देखील तुझी कीर्ती एकण्यास आवडते आणि माझे चित्त तर नेहमी तुझ्या पायाकडेच ओढ घेत असते. काही शब्द ऐकतांना त्यात विठ्ठलाचे नाम नसले तर ते शब्द ऐकतांना मला श्रम वाटते. मी तुझ्या वाचुन इतर कोणाचा आहे असे म्हणून घेतले तरी मला लाज वाटते आणि सहज देखील मी दुसऱ्याचा आहे असे मला बोलावे वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मला सर्व भक्तिभावाने काया-वाचा-मनाने तुच आवडतो आहेस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग