सांडूनि पंढरिची वारी
2032.
सांडूनि पंढरिची वारी | मोक्ष मागती ते भिकारी ॥१॥
ताट वोगरिले निके | सांडूनि कवण जाय भिके ॥२॥
जो नेणे नामगोडी | तोचि मुक्तिते चरफडी ॥३॥
आम्ही पंढरिचे लाटे | नवजो वैकुठींचे वाटे ॥४॥
झणी भ्याल गर्भवासा | नामा म्हणे विष्णुदासा ॥५॥
