सलीलकमलदलाक्ष राजीवल
2056.
सलीलकमलदलाक्ष राजीवलोचनु । परे परता पाहता निवे आमुचे मनु ॥१॥
कान्हया परम गोजरीया । कान्हया परम गोजरीया ॥धृ.॥
तनु मन बोधलें चित्त विगुंतले । पाहता पाहता मना समाधान जाले ॥२॥
ऐसा कमलगर्भींचा कंदु उभा परमानंदु । एका जनार्दना वेधु मजलागे माय ॥३॥
