वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

परिपूर्णपणें उभा । द

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086693 · अभंग क्र. २०५०

2050.
परिपूर्णपणें उभा । दिसे कर्दळांची गाभा । अंगीचिया प्रभा । धवळले विश्व ॥१॥
धन्य धन्य पांडुरंग । आम्हा जोडला वोसंग । कीर्ति गाता निसंग । अनुवाद तयाचा ॥२॥
ते सुख सांगता कोडीं । पापें पळती बापुडी । यमधर्म हात जोडी । न येचि तया गांवा ॥३॥
ऐसे एकविधभावाचे । संतचरण वंदिती साचे । एका जनार्दनी त्यांचे । दर्शन दुर्लभ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग